राज्यात सध्या अग्रस्थानी असलेल्या मतदार यादीतील घोळ यावर अनेक पदाधिकारी, नेते काम करताना दिसत आहेत. मतदार यादी संदर्भात जे दिल्लीत प्रेसें...
राज्यात सध्या अग्रस्थानी असलेल्या मतदार यादीतील घोळ यावर अनेक पदाधिकारी, नेते काम करताना दिसत आहेत. मतदार यादी संदर्भात जे दिल्लीत प्रेसेंटेशन राहुल गांधी यांनी केलं तेच महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे यांची टीम करणार आहे.
हे प्रेझेंटेशन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगाने पाहावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटने मोठ्या स्क्रीनवर पहावे, आम्ही त्याची व्यवस्था करू.
Sanjay Raut: राज्यात सध्या अग्रस्थानी असलेल्या मतदार यादीतील घोळ यावर अनेक पदाधिकारी, नेते काम करताना दिसत आहेत. मतदार यादी संदर्भात जे दिल्लीत प्रेसेंटेशन राहुल गांधी यांनी केलं तेच महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे यांची टीम करणार आहे. हे प्रेझेंटेशन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगाने पाहावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटने मोठ्या स्क्रीनवर पहावे, आम्ही त्याची व्यवस्था करू. लोकशाहीची कशी हत्या केली हे त्यांना त्यातून समजेल. एका एका विभागात बिन बापाचे मतदार आहेत. त्याची कदाचित त्यांना खात्री पटेल की आम्ही लोकशाहीची हत्या केली आहे. मतदार यादीतील घोळ हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. या विषयावर सर्वपक्षीय लोक काम करत आहेत. असा टोला संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत लगावला.
राज ठाकरेंनी मेळावा घेतला त्यांनीही याचं विषयावर जोर दिला. राहुल गांधीनी या विषयाची सुरुवात केली आहे. तेजस्वी यादवांनी बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा काढली. संपूर्ण देशामध्ये मतदार यादीतला घोटाळा गंभीर विषय आहे. हा एक नंबरचा मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा असेल. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मोर्चा विषयी सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात पुढील काही दिवसांमध्ये ते एकत्र येऊन चर्चा करतील. निवडणूक आयोगाला दणका देणे गरजेचे आहे. निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणून काम करत आहे. ८० रुपयांमध्ये एक मत डिलीट केले जाते. महाराष्ट्र मध्ये सुद्धा हा फॉर्म्युला लावला जात आहे. भारतीय जनता पार्टी आणि मिंधे त्यांच्या लोकांनी सहा एजेंसिला यासाठी कामाला लावले आहे. म्हणून तेच सांगतायेत की, महापौर आमचा होईल आणि त्यांचे ब्रँड अँबेसिडर कोठारे असतील, असा गमाभीर आरोप त्यांनी साकरकरवर लावला आहे.
दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे फोन सर्व्हिलन्सवर असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. हे फक्त भाजप कार्यकर्त्यांपुरतं नसून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन ऐकले जातायेत, त्यांचे व्हाट्सअप पाहिले जातात. बावनकुळे आणि त्यांची टीम रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर भाजपवर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा यांनी एकत्र येऊन वॉर रुम उघडले आहेत. याआधी आमचं सरकार येत असताना २०१९ साली हे प्रकार उघड झाले. त्यावर सरकारने गुन्हे दाखल केले त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळच्या पोलीस महासंचालक होत्या. म्हणून त्यांना भीती होती म्हणून ते सारखे बोलत होते मला अटक केली जाईल, मला अटक केली जाईल.
मुंबई, पुणे, नागपूर तीन ठिकाणी फोन टॅप करण्याचे मशीन लावले आहेत. यामध्ये पत्रकारांचेसुद्धा फोन टॅप केले जात आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्र सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. यांचा काही भरोसा नाही, हे अमित शाहांचे पण फोन टॅप करत असतील. या यंत्रणा आल्या कुठून ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


COMMENTS