पती परगावी कामाला होता आणि एकदा सासू-सासरे तिर्थाटनाला गेल्याचे पाहून सुनेने तिच्या बॉयफ्रेंड घरात बोलावले. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांच्य...
पती परगावी कामाला होता आणि एकदा सासू-सासरे तिर्थाटनाला गेल्याचे पाहून सुनेने तिच्या बॉयफ्रेंड घरात बोलावले. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांच्या बाहुपाशात पाच दिवस घालवले.अचानक सासू-सासरे अचानक घरी आले. त्यावेळी आपल्या सुनेला त्यांनी तिच्या बॉयफ्रेंड सोबत नको त्या अवस्थेत पाहिले. मग त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण नंतर विपरितच घडले.
बिहारच्या भागलपूरात एका लग्न झालेल्या महिलेचे एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. दोघेही लपून छपून भेटत असायचे. परंतू म्हणतात ना अशा गोष्टी कधी लपत नाहीत. अशीच घटना घडली. पती घरी नसल्याने या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडला बोलावले. त्यानंतर चार ते पाच दिवस मजेत काढले.
मात्र एक दिवशी सासू आणि सासेर घरी आल्याने त्यांना नको ते पाहावे लागले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. मग त्यानंतर पतीने एक धक्कादायक निर्णय घेतला.
मुंगेर जिल्ह्याच्या तारापूरात राहणाऱ्या साक्षी (20- नाव बदलले आहे ) हिचा विवाह सुमारे वर्षभरापूर्वीच अंगारी गावातील बिट्टू उर्फ सिंकदर कुमार सिंह याच्याशी झाला. लग्नानंतर बिट्टू नोकरी निमित्त बंगळुरु येथे गेला.
त्यानंतर साक्षी हीने तिच्या जुन्या प्रियकराशी पुन्हा संपर्क सुरु केला. ते दोघे पुन्हा जवळ आले. बिट्टूने गावात कुटुंबासाठी स्वंतत्र घर तयार केले त्यात साक्षी एकटी रहात होती. पती बाहेर गेल्याचे पाहून तिने पाच दिवसांपूर्वी प्रियकर राहुल याला घरी बोलावले. कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने तब्येत बरी नसल्याचे सांगत आराम करत असल्याचा आभास केला. राहुल घरातच माळ्यावरील खोलीत रहात होता.
रात्री साक्षीला सासू-सासरे जेवण देण्यासाठी गेले तर त्यांनी दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर सर्वत्र बोभाटा झाला. गावकरी जमले आणि अखेर पंचायत भरली. पंचायतीमध्ये पतीने सांगतले की तिचे मन जर त्याच्यात आहे तर त्याचे तिच्याशी लग्न लावा. अखेर पंचायतीने या दोघांचे गावात लग्न लावले. त्यांच्याकडून एकत्र राहाण्याचे स्टँप पेपरवर लिहून घेण्यात आले. राहुल याचे नातेवाईकही आले आणि साक्षीला आपल्या घरी घेऊन गेले.
साक्षीच्या घरी माहेरी ही घटना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येण्यास नकार दिला. तुम्हाला जे योग्य वाटते ते करा असे तिच्या माहेरच्या लोकांनी सांगितले. आपली बेइज्जती करुन घेण्यासाठी तेथे कोण येईल असे ते म्हणाले. बातमी लिहीपर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती.
COMMENTS