लातूर: पती छळ करतोय असे प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकराने तिच्या नवऱ्याचा खून करण्याच्या उद्देशाने कत्तीने वार केल्याची घटना शुक्रवारी र...
लातूर: पती छळ करतोय असे प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकराने तिच्या नवऱ्याचा खून करण्याच्या उद्देशाने कत्तीने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास लातूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या गेटवर घडली आहे.
यात प्रेयसीचा पती गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
भक्ती आणि अविनाश यांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती सचिनला या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती. सचिन मजुरीला बाहेर जाताना पत्नी भक्तीला घरात बंद करून कडी लावून जात असल्यामुळे भक्ती वैतागली होती. भक्तीने प्रियकर अविनाशला पतीकडून छळ होत असल्याचे सांगून त्याला संपवण्यास सांगितले.
अविनाश शुक्रवारी दुपारी लातुरात आला आणि म्हाडा कॉलनीच्या कमानीजवळ दबा धरून बसला. रात्री दहा वाजेच्या सुमारास सचिन सुर्यवंशी कमानीजवळ येताच अविनाशने त्याच्यावर कत्तीने गंभीर वार केले. मानेवर, चेहऱ्यावर आणि छातीत वर्मी वार लागल्यामुळे सचिन जागेवरच कोसळला. सचिन सूर्यवंशी याच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानेवर, चेहऱ्यावर आणि छातीत गंभीर वार झाल्यामुळे त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. विवेकानंद चौक पोलिसांनी हल्लेखोर प्रियकर अविनाश आणि त्याची प्रेयसी भक्ती या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांनी लॉजमध्ये प्लॅन केल्याचे उघड झाले.
COMMENTS