जुन्नर तालुक्यातील बहुतांश भागात सध्या मोठया प्रमाणात बिबट्याची दहशत पहायला मिळतं आहे असा एकही दिवस नाही की बिबट्या दिसला नाही रोजच कुठे ना ...
जुन्नर तालुक्यातील बहुतांश भागात सध्या मोठया प्रमाणात बिबट्याची दहशत पहायला मिळतं आहे असा एकही दिवस नाही की बिबट्या दिसला नाही रोजच कुठे ना कुठे बिबट्या दिसला माणसांवर हल्ला केला अशा रोजच्या बातम्या ऐकायला मिळतं आहेत यावर वन विभाग आणि प्रशासन यांच्या कामकाजावर मात्र शंका उपस्थित होतं आहेत कारण तालुक्यातील नाही म्हटलं तरी आतापर्यंत मोठया प्रमाणात जनावरे व आता तर माणसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यात लहान मुलं व मोठया व्यक्तीवर जीवघेणे हल्ले झालेत तर काही बळी गेलेत त्यानंतर मात्र लोकांचा प्रक्षओभ झाला की प्रशासन जाग होतं त्यानंतर उपाय शोधले जातात त्यावर निर्णय घेई पर्यंत दुसरी घटना घडते आणि मग प्रशासन लोकांचा रोष पाहून पिंजरे लावतात त्यात वाघ भेटला की घेऊन जातात असं किती तरी ठिकाणी सुरूच आहे, वाघाची पैदास मोठ्या प्रमाणात झाली असून प्रत्येक ठिकाणी वन विभागाने त्यांची लोकं पाहऱ्यासाठी ठेवावी आणि पिंजरे लावावेत तालुक्यात डोंगररांगा भरपूर आहेत लपण मोठी आहे मात्र अशीही काही ठिकाणे आहेत तिथे वन विभागाचे कर्मचारी नेमलेत मात्र ते तिथे जेव्हा एखादी घटना घडते तेव्हाच जातात, मग मात्र प्रश्न असा पडतो की नेमकं प्रशासन करतय काय? प्रत्येक ठिकाणी वाघाची भिती आहे त्यातही काही ठिकाणी पिंजरे लावले जातात तर काही ठिकाणी तर मोठी भिती असून तिथे पिंजरे लावले नाहीत मग लोकांचे रोजचे मरण हे प्रशासन डोळेझाक करून पाहतंय का? यावर योग्य निर्णय घ्यावा अशी माफक अपेक्षा.


COMMENTS