पुणे : वाघोली परिसरात शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार बादल शेख याचा त्याच्याच मित्राने खून केला आहे. या घटेने...
पुणे : वाघोली परिसरात शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार बादल शेख याचा त्याच्याच मित्राने खून केला आहे. या घटेनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वाघोली पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
वाघोली परिसरातील प्यासा हॉटेलसमोर अचानक मित्राने केलेल्या हल्ल्यात बादल शेख गंभीर जखमी झाला आणि त्याच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. वाघोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी हल्ल्यानंतर पसार झाला आहे. वाघोली पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके नियुक्त केली असून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध मार्गांवर चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्याच्या उपनगरांतही गुन्हेगारी टोळकी सक्रीयपणे काम करीत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.


COMMENTS