राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वारंवार भेटीगाठी होत आहेत. यावरून अनेक...
राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वारंवार भेटीगाठी होत आहेत. यावरून अनेक चर्चा रंगत आहेत. यातच काल शिवाजी पार्क येथे दीपोत्सवानिमित्त दोघे भाऊ एकत्र आले होते.
तर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात आम्ही एकत्र लढू अशी आज माहिती आज माध्यमांसमोर दिली आहे. यातच आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Avinash Jadhav: राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वारंवार भेटीगाठी होत आहेत. यावरून अनेक चर्चा रंगत आहेत. यातच काल शिवाजी पार्क येथे दीपोत्सवानिमित्त दोघे भाऊ एकत्र आले होते. तर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात आम्ही एकत्र लढू अशी आज माहिती आज माध्यमांसमोर दिली आहे. यातच आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही एकत्र काम सुरू केलं आहे. शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र येऊन मोर्चा झाला. त्या मोर्चाला यश देखील मोठ्या प्रमाणात आलं. त्या अधिकाऱ्याची बदलीची मागणी आम्ही केली होती, त्याची बदली देखील झाली. लोकहिताच्या कामासाठी शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील. युती आघाडीचा निर्णय राज ठाकरे घेतील. राज ठाकरे जो आदेश देतील, आम्ही तिथे जाऊ. पण आता या क्षणाला काम सुरू केलेला आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने जी काही राजकता माजवली आहे. त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणे गरजेचे होतं. ठाण्यात भितीच वातावरण होतं, दहशतीचा वातावरण होतं भ्रष्टाचाराच वातावरण आहे. सगळीकडे आमच्या ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिले जात आहे. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला जर पुसायच्या असतील, तर आम्हाला एकत्र येणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही काम सुरू केलेलं आहे. निवडणुकीला कसा एकत्र यायचं हे राज ठाकरे सांगतील, असे म्हणत एका अर्थी युतीला होकारच दर्शविला.
ठाण्यात भाजप शिवसेना स्वबळ लढण्यावरून, हे जर वेगवेगळे लढले ना, तर आम्ही यांचे पानिपत करू. कारण विधानसभेला राजन विचारे यांना पडलेली मत आणि मला पडलेली मत यांची जर तुम्ही बेरीज केली, तर यांनी वेगवेगळं लढून दाखवावं. आमच चॅलेंज आहे, तुमच्यात हिम्मत आहे ना दोघांनी वेगवेगळे लढून दाखवावं. यांची लढाई जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी आहे, असे मत राजन विचारे यांनी यावेळी व्यक्त केले.


COMMENTS