कोल्हापूर : बहिण आणि दाजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असताना दुसरीकडे त्यांचाच अपघात झाल्याची घटना घडली. दोघेही जखमी झाले असू...
कोल्हापूर : बहिण आणि दाजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असताना दुसरीकडे त्यांचाच अपघात झाल्याची घटना घडली. दोघेही जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दत्तात्रय रघुनाथ पवार (वय 32 रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय 28 रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे.
सातेरी देवीवरून दर्शन करून खाली येत असतानाच वाघोबावाडीला जाणाऱ्या घाटात शंभर फूट खाली शेतामध्ये पवार दाम्पत्याची कार कोसळली. अपघातानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे, बहिण आणि दाजींचा कोणताही पत्ता लागत नसल्याने अतुल कृष्णा शिंदे (वय 34 रा. 243, शनिवार पेठ, पाठण कॉलनी, कराड, ता. कराड जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. अतुल शिंदे यांनी 7 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास सांगरुळ (ता. करवीर) येथून दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दोघेही न सांगता निघून गेल्याने आणि त्यांच्याकडे कोणताही संपर्क होत नसल्याने अतुल शिंदे यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
अतुल शिंदे यांनी फिर्याद दाखल केली असतानाच बहिण अश्विनी आणि दाजी दत्तात्रय हे सातेरीच्या दर्शनाला गेले असतानाच परतून येत असतानाच त्यांच्या अपघाताची सुद्धा बातमी समजली. यानंतर दोघांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमागे काही घातपात आहे का? की यांचा अपघातच झाला होता, या संदर्भात पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS