लखनौ (उत्तर प्रदेश) : एक ७५ वर्षांच्या आजोबांनी ३५ वर्षीय महिलेशी लग्न केले. पण, हनिमूनची रात्र आजोबांसाठी शेवटची रात्र ठरली. सकाळी त्याचा म...
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक ७५ वर्षांच्या आजोबांनी ३५ वर्षीय महिलेशी लग्न केले. पण, हनिमूनची रात्र आजोबांसाठी शेवटची रात्र ठरली. सकाळी त्याचा मृत्यू झाल्यामुळे जौनपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
कुचमुच गावात राहणारे शेतकरी संगरू राम (वय ७५) यांनी जलालपूरमधील मानभावती (वय ३५) या महिलेसोबत लग्न केले होते. संगरू यांचे पहिले लग्न झाले होते. परंतु, पहिल्या पत्नीचं एक वर्षापूर्वी निधन झाले होते. मुल नसल्यामुळे ते एकटेच राहत होते. त्यांचा भाऊ आणि पुतण्या दिल्लीत राहतात आणि तिथं व्यवसाय करतात.
संगरु राम गेल्या काही दिवसांपासून एकटेपणाला कंटाळून पुनर्विवाह करण्याबद्दल बोलत होता. गावकऱ्यांनी त्यांना वय झाल्याचे सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. सोमवारी त्यांनी कोर्टात लग्न केले त्यानंतर मंदिरात लग्न केले. मानभावती या महिलेचे सुद्धा हे दुसरं लग्न होते. तिला पहिल्या लग्नापासून 2 मुली आणि 1 मुलगा देखील आहे. मनभावती म्हणाली की, संगरू रामने तिला घर सांभाळायला आणि तो मुलांची काळजी घेईल, असे सांगितले होते. हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते बोलत राहिले. सकाळी अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. संगरु रामच्या पुतण्यांनी हे प्रकरण संशयास्पद असल्याचे म्हणत अंत्यसंस्कार थांबवले आणि आता चौकशीची मागणी केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS