केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज ५ ऑक्टोबर शिर्डीतल्या साईमंदिराला भेट ते साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर लोणी बाजारतळ येथे आय...
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज ५ ऑक्टोबर शिर्डीतल्या साईमंदिराला भेट ते साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थिती लावली.
आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णकृती पुतळ्यांचे अनावरण झाले. तो देखील पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा दुग्धशर्करा योग आहे. १९८५ सालापासून साखर कारखान्यांना आयकर लावण्यात येत होता. मात्र, अमित शाह यांनी तात्काळ प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय घेतला. ९५०० कोटी रुपयांचा कर आपला माफ झाला. लाखो शेतकऱ्यांना आणि कारखान्याला दिलासा मिळाला. चांदा ते बांदा उस जिथे पिकतो तिथे सहकारी साखर कारखाने उभे झाले आणि आर्थिक सुबत्ता यायला लागली.
अजित पवार पुढे म्हणाले की, आम्ही सर्व नेते काल अतिवृष्टीसंदर्भात बैठकीला बसलो होतो. पंचनाम्यासंदर्भात देखील लवकर गोष्टी व्हाव्यात हे सांगितले. सोबतच, अमित शाह यांनी अहवाल लवकर पाठवण्याचे सांगितले आहे, जेणेकरुन मदतीसंदर्भात निर्णय होईल. पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो, असे वचन अमित शाह यांनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.इतकंच नाही तर,
इतकंच नाही तर, काही कारखाने निवडून आणि प्रोडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करु. साखरेचे भाव २१०० पर्यंत खाली यायचे मात्र कितीही झालं तरी ३३०० रुपयांच्या खाली आता साखर विकता येत नाही. त्याच इथेनॉल आणि बायप्रोडक्टची भर पडते आहे. माझी विनंती आहे की, निवडणुकीच्या वेळी काय राजकारण करायचं आहे ते करा. मात्र नंतर मदत करा आणि हातभार लावा, असे अजित पवार यांनी म्हटले.


COMMENTS