संतापजनक : CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो. | CrimeNama
Loading ...

संतापजनक : CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो.

  चंदीगड (हरियाणा): एका महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी यमुनानगर जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्य...

 


चंदीगड (हरियाणा): एका महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी यमुनानगर जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित अधिकारी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन महिला डॉक्टराने सीएमओकडून होत असलेल्या मानसिक व शारिरीक छळाची माहिती दिली. त्यामध्ये, 10 ते 15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे, असे म्हणत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने कार्यालयातील डॉक्टर महिलेवर दबाव टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


यमुनानगर येथील सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरने येथील सीएमओ मंजितसिंहवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. संबंधित अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून आपणास त्रास देत आहे. तसेच, जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे महिला डॉक्टर पुराव्याचा पेनड्राईव्ह घेऊनच पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात दाखल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या महिलेने सर्व पुरावे पोलिस ठाण्यात दिले आहेत. पीडित महिला डॉक्टर दलित असून मंजितसिंह याने जातीवाचक अपशब्द वापरत महिलेचा अवमान केला. तसेच, फोनवरुन अश्लील चॅटही महिला डॉक्टरला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने तक्रारीमध्ये म्हटले की, ‘मंजित सिंह हा सातत्याने लज्जास्पद वर्तन करत होता, त्यामुळे सीएमओ कार्यालयात जातानाही मला भीती वाटत होती. विनाकारण ते मला ऑफिसमध्ये बोलवायचे आणि लज्जास्पद व जातीवाचक संवाद करायचे. 20 सप्टेंबर रोजी त्यांनी मला सातत्याने फोन केले. याबाबत आपण आईला माहिती दिली, तसेच फोनवरील संभाषण रेकॉर्डही केले आहे. दरम्यान, It's now or never, get ready in 10 to 15 minutes असे म्हणत महिलेला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी फोनवरुन बोलवल्याचे कॉल रेकॉर्डींग पुरावा म्हणून पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच, तू का घाबरत आहे, यापुढे कुठल्याही कामासाठी माझ्याकडे येऊ नको, मी तुझी मदत करणार नाही. अन्यथा, मला तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत, याबाबत कुणालाही बोलू नको, अशी धमकीही सीएमओने दिली आहे.’ दरम्यान, पोलिसांनी आरोपी मंजितसिंह विरुद्ध यमुनानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3780,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1244,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,561,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,298,Maharashtra,1709,Mumbai,415,Nagpur,49,Nashik,58,Politics,606,Pune,1874,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,67,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: संतापजनक : CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो.
संतापजनक : CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOpxa1Lk7Yw5SnAV55ACq5HdFuNH3318tl1ery7bY8oEUz7XjdF5LvCJhwmbbuwHBnyg_y5fZRWVQZ4xq5IjAevKv-HF1oh0yY1J1E-V_JzUVSnICInuWZGlFJFgL-v0tUSWiRxxZ2R2z_w2BXxxegv5dAUGCvFfy_OqF4fC2XVcoC-WM58Y0xjea3NGY/s320/1000752903.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOpxa1Lk7Yw5SnAV55ACq5HdFuNH3318tl1ery7bY8oEUz7XjdF5LvCJhwmbbuwHBnyg_y5fZRWVQZ4xq5IjAevKv-HF1oh0yY1J1E-V_JzUVSnICInuWZGlFJFgL-v0tUSWiRxxZ2R2z_w2BXxxegv5dAUGCvFfy_OqF4fC2XVcoC-WM58Y0xjea3NGY/s72-c/1000752903.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/09/cmo.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/09/cmo.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content