प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला टीकेचा बाण साधला. "देवेंद्र फडणवीस ...
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला टीकेचा बाण साधला. "देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता दुष्काळाशिवाय कर्जमाफी करणार नाही.
आता दुष्काळही पडला, त्यांचे बोलणे शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. आता दुष्काळाचे ही पैसे द्या आणि कर्जमाफी ही करा. फक्त आता शब्द फिरवू नका एवढीच अपेक्षा आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोधकांकडून या रिफॉर्मला खोटारडेपणा असं संबोधण्यात आलं. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सरकारला धारेवर धरलंय.
"लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकी पुरता विचार होता, आता बिहार आणि इतर राज्यांच्या निवडणुका आहेत. आता जीएसटी हा केवळ चुनावी जुमला आहे. दूध गाईचं की म्हशीचं हा फार महत्त्वाचा विषय नाही तर त्याचा उपयोग आम्ही सामान्य माणसाला किती देतो आणि उद्योगपतींना किती देतो हे महत्त्वाचं. मोदींनी हे देखील सांगायला पाहिजे की दहा वर्षाच्या कार्यकाळात २०० लोकांना १८ लाख करोड माफ केले, अदानी अंबानीला माफ केले. त्याप्रमाणे गुजरातमध्ये जो प्रकल्प आला ४९ हजार कोटींचा त्याचे फक्त ५४० कोटी जमा करून घेतले, ४८००० कोटी कोणी माफ केले? जी गोष्ट समोर यायला पाहिजे ती येत नाही, त्यामुळे या सर्वांमध्ये माझा शेतकरी कुठे आहे. जीएसटी कमी जास्त बजेटमध्ये शेतकऱ्यांना किती हिस्सा मिळणार आहे ? या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसांपर्यंत गेल्या पाहिजे." पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या GST रिफॉर्मवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले.


COMMENTS