१४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू. | CrimeNama
Loading ...

१४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू.

एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले...



एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत एका मुलाचा मृत्यू झाला होता.


मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर दुपारी भीषण आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेत बेडरुममध्येच होरपळून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर दोन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पाच जण जखमी झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच अग्निशमन गाड्या आणि एक हायड्रॉलिक शिडी घटनास्थळी पाठवली होती. आग आटोक्यात आणत असतानाच फ्लॅटमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे दोन अग्निशमन दलाचे जवान आणि तीन रहिवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील घरातील स्वयंपाकघरातून आग सुरू झाली. त्यानंतर, दोन सिलिंडरचे स्फोट झाले, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला. शेजारीही आत अडकलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण फ्लॅटमध्ये फर्निचर असल्यामुळे आगीची तीव्रता जास्त होती. आग संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरली होती. आम्हाला बेडरूममध्ये सुमारे १५ वर्षांचा एक मुलगा मृतावस्थेत आढळला. आम्ही शक्य तितक्या लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीच्या तीव्र उष्णतेमुळे कोणालाही वाचवणे अत्यंत कठीण होते. स्वयंपाकघर फ्लॅटच्या प्रवेशद्वाराजवळ होते आणि आम्ही फ्लॅटमध्ये प्रवेश करताच दुसऱ्या सिलिंडरचा स्फोट झाला.’

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3786,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1248,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,565,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,299,Maharashtra,1711,Mumbai,416,Nagpur,49,Nashik,58,Politics,607,Pune,1875,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,67,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू.
१४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_y_KH9D02Q4ywJQ1C_B6jCot9MMY8LmFaVpG6_ALlJDw19vVxS7MbUAwFDa4M69ZKjHgQ7DmVo8Juq3wHr8xgUc0e3CfxPxK4Bq3by3bz4FbvNm2WZeTdEGmOguvJglu_c2a2yK9J-qMm1bzikP4cseMsZExJJ3kvOLggm4gV6KjIWDmA-IMi5cTGKvg/s320/1001313806.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_y_KH9D02Q4ywJQ1C_B6jCot9MMY8LmFaVpG6_ALlJDw19vVxS7MbUAwFDa4M69ZKjHgQ7DmVo8Juq3wHr8xgUc0e3CfxPxK4Bq3by3bz4FbvNm2WZeTdEGmOguvJglu_c2a2yK9J-qMm1bzikP4cseMsZExJJ3kvOLggm4gV6KjIWDmA-IMi5cTGKvg/s72-c/1001313806.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/09/blog-post_71.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/09/blog-post_71.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content