लखनौ (उत्तर प्रदेश): भाजप नेता रणधीर सिंह यादव याच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. डॉक्टरने त्याच्या पत्नीला मित्रासोबत र...
लखनौ (उत्तर प्रदेश): भाजप नेता रणधीर सिंह यादव याच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. डॉक्टरने त्याच्या पत्नीला मित्रासोबत रंगेहाथ पकडले आणि प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट केला आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
भाजप नेता रणधीर सिंह यादव याचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदय याची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा बँक खात्यातून एक निश्चित रक्कम अंजलीला ट्रान्सफर करत असे. अंजलीने ही रक्कम तिच्या गरजांसाठी खर्च करत होती. रणधीर आणि उदय या दोघांची आठ वर्षांपासून मैत्री होती. 3 वर्षांपूर्वी उदयची पत्नी अंजली आणि रणधीरचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते.
उदय हा मित्र रणधीरला त्याच्यासोबत घरी घेऊन गेला होता. त्या दिवशी रणधीरने अंजलीला पहिल्यांदा पाहिले. रणधीर यादव जिल्हा पंचायत सदस्य होता. पत्नी सध्याची जिल्हा पंचायत सदस्य आहे. रणधीर आणि अंजली हळूहळू जवळ आले. रणधीर हा अंजलीच्या गरजा पूर्ण करायचा. रणधीर जेव्हा गरज पडेल तेव्हा उदयला पैसे देत असे. पुढे उदयला त्याची पत्नी अंजलीचे रणधीरवर असलेले प्रेम जाणवले होते. उदयने स्वतः हिल स्टेशनवर जाण्याची योजना आखली.
रणधीरने त्याच्या गाडीने नैनितालला रस्त्याने जाण्याचे नियोजन केले. 20 जून रोजी सर्वजण नैनितालला पोहोचले. 1 जुलै रोजी ते परतले. या ट्रिपवर रणधीरने 1.75 लाख रुपये खर्च केले. नैनिताल ट्रिप दरम्यान उदयला त्याची पत्नी अंजलीचे रणधीरशी खोलवरचे संबंध असल्याचे पुरावे दिसले. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये अंजलीचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील काढले होते. 2 जुलै रोजी उदय आणि त्याची पत्नी अंजलीमध्ये भांडण झाले. यानंतर अंजलीने रणधीरला फोनवर संपूर्ण प्रकरण सांगितले. 11 जुलै रोजी उदयने त्याच्या पत्नीची हत्या केली. उदयने पुढे भाजप नेत्याच्या हत्येची योजना आखली. त्याने दोघांना 50 हजार रुपयाची सुपारी दिली आणि हत्या घडवून आणली. पोलिसांनी तपासादरम्यान रवी पासीला (वय २४) पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अजूनही त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.
COMMENTS