पालघर: पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावामधील एका युवकाने होणाऱ्या पत्नीचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल...
पालघर: पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावामधील एका युवकाने होणाऱ्या पत्नीचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पालघर जिल्ह्याच्या बिबलधर गावातील युवतीचे आरोपीसोबत लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हा विवाह होणार होता. घटनेच्या दिवशी पीडित युवतीचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ती घरात एकटीच होती. तिचा होणारा नवरा तिथे आला आणि त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पण तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला.
तरीही आरोपीने तिच्यावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. पण लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणार नाही, असे युवतीने सांगितले. यानंतर आरोपी संतापला. त्याने रागाच्या भरात तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला.
आरोपी या प्रकारानंतर आरोपी गावाजवळील जंगलात पळून गेला. संध्याकाळी मुलीचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना मुलगी मृतावस्थेत आढळली. मुलीच्या आईने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


COMMENTS