मराठवाड्यामध्ये सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निसर्ग कोपला असल्याचा भास होतो आहे. अतिमुसळधार पावसामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जग...
मराठवाड्यामध्ये सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निसर्ग कोपला असल्याचा भास होतो आहे. अतिमुसळधार पावसामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जगाला पोसणाऱ्या बळीराजाचा संसार पाण्यात वाहून गेला.
मराठवाड्यात दुष्काळामुळे व्यथित असलेला शेतकरी नेहमी चांगल्या पावसाची अपेक्षा करत असतो. पण यावेळी झालेल्या अतिमुसळधार पावसाने त्याची पावसाबद्दलची ओढ आता ओसरली आहे. मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः खरडून गेली आहे. अशा परिस्थितीत शालार्थ तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
येत्या काही दिवसांत स्पर्धा परीक्षा तसेच इतर परीक्षा होणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा होणार आहे. परंतु पूरजन्य परिस्थितीत अभ्यासासाठी वेळ न मिळाल्याने तसेच परीक्षा केंद्रावर जाणे अवघड असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील वाचनालये बंद असल्याने परीक्षेसाठी पुरेशी तयारी झाली नसल्याने ही मागणी केली जात आहे. 'संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहतुकीची सेवा ठप्प झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सत्य परिस्थिती लक्षात घेता २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्यात. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नये.' अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने देखील केली आहे.
तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील याबाबत ट्विट करत लिहिले आहे,"राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी #MPSC राज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही. तसंच सारथी, बार्टीचे पेपर २९ व ३० तारखेला होत आहेत. याबाबतही योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती!" अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अजून काही निर्णय आला नसला तरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधीक्षक, बृहन्मुंबई मनपा, गट अ व जा.क्र.१०७/२०२५ सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गांच्या मुलाखती दि.७ ऑक्टो २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
मराठवाड्यामध्ये सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निसर्ग कोपला असल्याचा भास होतो आहे. अतिमुसळधार पावसामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जगाला पोसणाऱ्या बळीराजाचा संसार पाण्यात वाहून गेला. मराठवाड्यात दुष्काळामुळे व्यथित असलेला शेतकरी नेहमी चांगल्या पावसाची अपेक्षा करत असतो. पण यावेळी झालेल्या अतिमुसळधार पावसाने त्याची पावसाबद्दलची ओढ आता ओसरली आहे. मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः खरडून गेली आहे. अशा परिस्थितीत शालार्थ तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.


COMMENTS