धुळे : शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात होऊन पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य ...
धुळे : शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात होऊन पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोघे कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महामार्ग पोलिसांची व्हॅन क्रमांक एमएच 18 बीएक्स 0232 ही दहिवद येथून जात असताना कारखान्याजवळ भारत पेट्रोल पंपासमोर अचानक व्हॅनचा टायर फुटला. यामुळे व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन-तीनदा पलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात पोलिस कर्मचारी नवलसिंग हवल्या वसावे (वय २९, रा. नंदुरबार) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी प्रकाश राजाराम जाधव आणि अनिल अण्णा पारधी हे जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमी असलेले प्रकाश जाधव आणि अनिल पारधी यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन हे मृत पोलिस कर्मचारी नवलसिंग वसावे हे चालवत होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS