अमरावती जिल्ह्यातील पूर्णतः संत्रा खाली पडलेला आहे. केळी दोनशे रुपये क्विंटलन एवढ्या खाली म्हणजे ते तोडले पण परवडत नाही अशा वाईट परिस्थितीमध...
अमरावती जिल्ह्यातील पूर्णतः संत्रा खाली पडलेला आहे. केळी दोनशे रुपये क्विंटलन एवढ्या खाली म्हणजे ते तोडले पण परवडत नाही अशा वाईट परिस्थितीमध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करणे अपेक्षित होतं पण मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही. ओला दुष्काळ जेव्हा जाहीर होतो तेव्हा त्याची सक्तीची कर्ज वसुली थांबते त्यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही. दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ म्हणत होते, आता देवा भाऊचे देवाने ऐकले.आता दुष्काळ पडला. मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी द्यावी. आता अनेक अडचणी शेतकऱ्यांकडे आहे. हे मुख्यमंत्री यांनी सांगावे. याबाबत कधी निर्णय घेणार तातडीने बैठक घेऊन सूचना द्या. असे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर घणाघात केला.
गोट्या खेळून दोन वेळा शपथविधी घेतली, पैसे नाही, लाडक्या बहणीला का बदनाम करता, शक्तीपीठ कोणी मागितला, मुंबईत स्मार्ट सिटीत पैसा गुंतवला, शेतकरी अडचणीत आल्यावर काय करणार, पगार कपात करा, पंजाब प्रमाणे दबाव करा, दादाची दादागिरी सत्तेत राहण्यासाठी आहे, अजित दादा यांनी दादागिरी दाखवा न… आमदाराने दिले तरी ९० कोटी होईल, सर्वाना झळ पोहचली पाहिजे, गडचिरोली ३१ हत्तीने नुकसान केलं, २० शेतकरी वाघाच्या हल्ल्यात मारले, शेतकऱ्याचे जीवन कुत्र्या मांजरा सारखे जगे मरे काही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीत लक्ष नाही, त्या जिल्ह्यात पोत्याच नुकसान झालंय. असा म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.


COMMENTS