घाटंजी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील ब्राम्हणी येथील आरोपीने दारुच्या नशेत जन्मदाती आईवर बलात्कार केल्या प्रकरणी केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा ...
घाटंजी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील ब्राम्हणी येथील आरोपीने दारुच्या नशेत जन्मदाती आईवर बलात्कार केल्या प्रकरणी केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी प्रत्येकी गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व १० हजार रुपये दंड ठोठावला.
शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी युक्तीवाद केला.
वणी तालुक्यातील ब्राम्हणी (जि. यवतमाळ) येथे दि. १९ जुलै २०२१ रोजी पिडिता/आई हि तिच्या मुलीला भेटण्याकरिता वणीला गेली होती. आरोपी याने पिडित आईला ‘तु मुलीला भेटायला कां गेली? असे म्हणून तिला दोन ते तिन दिवस मारहाण केली.’ २३ जुलै २०२१ रोजी शुक्रवारी रात्री ०९.०० चे दरम्यान पिडितेचा पती झोपल्यानंतर आरोपी दारूच्या नशेत घरी आला व पिडिताला जेवणाची मागणी केली असता, तिने जेवणाचे ताट आरोपीला त्याच्या रूममध्ये नेऊन दिले. आरोपीचे जेवण झाल्यावर त्याने तिला पट्ट्याने बेदम मारहाण केली. आरोपी आईला म्हणाला, तुला मलम लाउन देतो असे म्हणून पिडितेचे पायाला मलम लाउन देत असतांना तो तिच्या अंगावर झोपला व तिचे तोंड दाबले व तिला मारून टाकण्याची धमकी दिली. आरोपीने पिडीतेचे पुर्ण कपडे काढले व त्याने पिडितेला धमकी दिली. मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवून रात्री ०३.०० वाजता जिवे मारण्याची धमकी देउन जबरदस्तीने बलात्कार केला. सदर घटनेच्या पश्चातामूळे व परत वरील प्रमाणे पुन्हा घटना करेल ह्या भितीपोटी पिडित आईने विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे तिची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने तिला सुगम हॉस्पिटल, वणी येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. नंतर सहा दिवसानंतर तिला शुद्ध आल्यानंतर तिने वणी पोलीस स्टेशनला ३० जुलै २०२१ रोजी आरोपी राकेश दत्तू काळे (वय २६) याच्या विरूध्द रिपोर्ट दिल्यावरून आरोपी विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन, भांदवी कलम ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (एन), ३२३, ५०६ अन्वये अपराध क. ६०४/२१ ची नोंद करून पोलिस उपनिरिक्षक अरूण नाकतोडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला.
सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण ८ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाची बाजू ग्राहय धरून आरोपी यांस भादंवि कलम ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (एन) अन्वये दोन्ही गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व १० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच भादंवि कलम ३२३ मध्ये १ वर्षाची शिक्षा व १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. पैरवी अधिकारी म्हणून पो. हे. काॅ. संतोष मडावी यांनी सहकार्य केले. आरोपी पक्षाची बाजू ॲड. सिद्धार्थ लोढा यांनी मांडली.


COMMENTS