पुणे: पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अनिकेत उर्फ हेल्मेट अनिल गायकवाड याच्या विरुद्ध एम पी ...
पुणे: पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अनिकेत उर्फ हेल्मेट अनिल गायकवाड याच्या विरुद्ध एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, वर्धा कारागृह वर्धा येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्धतेचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अनिकेत उर्फ हेल्मेट अनिल गायकवाड (वय २३, रा खडकी औंध, चव्हाण वस्ती, पुणे) हा अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार असून, त्याने त्याच्या साथीदारांसह चतुर्श्रुंगी व खडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत जीव घेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये त्याचे विरुद्ध ७ गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेले होती तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव सह कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अट्टल गुन्हेगार अनिकेत उर्फ हेल्मेट अनिल गायकवाड याचे विरुद्ध एम पी डी ए कायद्यान्वये वर्धा कारागृह वर्धा येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्धतेचाआदेश पारित केले आहेत 1. जावक क्रमांक/ क्राइम पीसीबी/ डीईटी/ चतुर्शिंगी/ गायकवाड /७१३/2025 दि. २९/०८/२०२५ अन्वये. 2. जावक क्रमांक/ क्राइम पीसीबी/ डीइटी /चतुर्श्रुंगी /गायकवाड रवानगी आदेश ७१४/२०२५ दिनांक २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले औषधी द्रव्य विषय गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्स) यांचे विघातकृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम सण 1991 (1981 सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 55)( सुधारणा 1996)(सुधारणा 2009)(सुधारणा 2015) कलम 3(2) प्रमाणे सदर आरोपीस वर्धा कारागृह, वर्धा येथे स्थानबद्ध करन्या करिता दि ३०/८/२०२५ रोजी अटक करून वर्धा कार गृह येथे रवानगी करण्यात आलेले आहे.
सदरची उत्तम कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजन कुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, सोमय मुंडे, पोलिस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर, विठ्ठल दबडे सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनान्वये उत्तम भजनावळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अश्विनी ननवरे पोलिस निरीक्षक (गुन्हे), नरेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोहावा 1178 मोमीन, पोशी 9049 पालांडे, पोशी 3902 ठोसर, मोपोशी 9248 कुंभार सर्व नेमणूक चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी केली आहे.
COMMENTS