1) जमीन खरेदी विक्री व्यवहार सब रजिस्ट्रार ऑफिसला नोंदणीकृत असावा . 2) किमान 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात शेत जमीन खरेदी करू नका. (प्र...
1) जमीन खरेदी विक्री व्यवहार सब रजिस्ट्रार ऑफिसला नोंदणीकृत असावा .
2) किमान 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात शेत जमीन खरेदी करू नका. (प्रत्येक जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्र वेगवेगळे आहे )
3) बिगरशेती आदेश प्राप्त जमीन 20 गुंठ्या पेक्ष्या कमी असेल तरी खरेदी करता येते. त्यासाठी मंजूर रेखांकन व त्या प्रमाणे पोटहिस्सा मोजणी झालेली असावी
4) शेतकरी नसलेल्या व्यक्तीस महाराष्ट्रात शेत जमीन खरेदी करता येत नाही.
5) आदिवासी व्यक्तीची शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस खरेदी करता येत नाही.
6) वर्ग 2 म्हणजे इनाम वतन देवस्थान इत्यादी जमीन सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेता परस्पर विकता येत नाही.
7) नोटरी किंवा 100 च्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन वर्ग 2 ची जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवणे याला कोणताही कायदेशीर आधार नाही.
8) जमिनीवर कोणत्याही संस्थेचा बोजा कमी न करता जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार कायदेशीर नाही.
9) सहहिस्सेदार यांची सहमती न घेता परस्पर जमीन विक्री करणे कायद्याने गुंतागुंत वाढविणारे आहे त्यासाठी अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र करता येते परंतु त्यात दिशा व हिस्सा ठरलेला नसतो
10) देवस्थान व महार वतन जमीन परस्पर विक्री करता येत नाही याला महाराष्ट्र शासनाची / जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते.
COMMENTS