मुंबई : विजेच्या तारांमुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला आहे. दीपक पिल्ले (वय १७) असे...
मुंबई : विजेच्या तारांमुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला आहे. दीपक पिल्ले (वय १७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपक एल. बी. एस. मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने जात होता. कानात त्याने हेडफोन घातल्यामुळे नागरिकांनी दिलेला आवाज त्याला ऐकू आला नाही. रस्त्यावर महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती, आणि त्याच्याशी संपर्कात येताच विजेचा जोरदार शॉक लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला आवाज देऊन बाजूला जाण्यासाठी सांगितले. परंतु कानातल्या हेडफोन मुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या वायरच्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकाराने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, नागरिकांनी आणि प्रशासनाने अशा ठिकाणी त्वरित सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
COMMENTS