सांगली: पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या खानापूरमधील आळसंदमध्ये ...
सांगली: पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या खानापूरमधील आळसंदमध्ये घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनिता जाधव यांचे अल्पशा आजाराने 2 ऑगस्ट रोजी निधन झाले. बुधवारी त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात येणार होते. परंतु, त्याच दिवशी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती धनाजी जाधव यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे आळसंद गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.


COMMENTS