मुंबईः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू असून, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आले आहेत. गेल्या दोन दिवसात द...
मुंबईः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू असून, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आले आहेत. गेल्या दोन दिवसात दोन मराठा आंदोलकांचे निधन झाले आहे. दोन्ही आंदोलकांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.
मात्र, त्यांना वाचवता आले नाही. काल रात्री एका मराठा आंदोलकाला चक्कर आल्याचा प्रकार समोर आला होता.
आझाद मैदानाच्या समोरच्या बाजूला असलेल्या बीएमसी इमारतीसमोर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली असून, अनेकांनी तिथंच ठिय्या सुरू केला आहे. त्यावेळी वाजत गाजत मराठा बांधव जल्लोष करत असताना एका मराठा आंदोलकाला चक्कर आली आणि तो खाली पडला. एक युवक खाली पडल्याचे दिसताच सर्वांना नाचगाणी थांबवली आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुंबई पोलिसांचे कर्मचारी देखील तातडीने धावून आले.
मुंबई पोलिसांनी माणुसकीचं दर्शन घडवले. मुंबई पोलिसांनी रुग्णवाहिकीची वाट न पाहता पोलिस गाडीत हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यावेळी इतर मराठा आंदोलकांनी तातडीने वाट मोकळी करून दिली आणि पोलिसांच्या गाडीला रस्ता मोकळा करून दिला. एक अॅब्युलन्स आली असताना मराठा बांधवांनी बँरिकेट्स बाजूला करून अॅब्युलन्सला जागा करून दिली होती. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
COMMENTS