ग्रेटर नॉएडा येथे निक्की या विवाहीत महिलेला जाळून मारण्यात आलं, याप्रकरणी सासरच्यांवर अनेक आरोप असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या केसम...
ग्रेटर नॉएडा येथे निक्की या विवाहीत महिलेला जाळून मारण्यात आलं, याप्रकरणी सासरच्यांवर अनेक आरोप असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
या केसमध्ये रोज नवनवे खुलासे होत असतानाच आता मध्य प्रदेशमधून देखील एक अत्यंत हादरवणार प्रकार समोर आला आहे. तिथे एका नवविवाहीत महिलेशी तिचा पती आणि सासरच्या लोकांनी जे वर्तन केलंय ते पाहून हैवानालाही लाज वाटेल. पतीने फक्त तिला मारहाण केली नाही तर गॅसवर चाकू गरम करून, त्याच चाकूने तिच्या शरीरावर विविध ठिकाणी चटके दिले. रविवारी घडलेल्या या बयानक घटनेत तिच्या पतीने हात, पाय, पाठ आणि ओठांवरही तिला चटके दिले असून ती गंभीर जखमी झाली आहे.
खूशबू असं पीडित महिलेचं नाव आहे. लग्नापासूनच तिच्या पतीला, दिलीपला ती आवडत नव्हती आणि तो नेहमीच हुंड्यासाठी तिला मारहाण आणि छळ करत असे, असा आरोप तिने केला आहे. रविवारच्या या घटनेनंतर तिने कशीबशी सुटका करून घेत माहरेच्यांना कळवलं आणि ते तिला घरी घेऊन गेले.
खरगोन जिल्ह्यातील मैनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आवरकच्छ येथील रहिवासी असलेल्या खुशबूचा विवाह 2 फेब्रुवारी 2025 रोजी बरवानी जिल्ह्यातील अंजद येथील रहिवासी दिलीप पिपलिया याच्याशी झाला.रविवारी रात्री खुशबूसोबत तिच्या सासरच्या घरात जे घडलं, त्या क्रूरतेने महिलांवरील अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तिचा पती दिलीप मद्यधुंद अवस्थेत होता, त्याने गॅसवर चाकू गरम केला. त्यानंतर त्याने तिला हात, पाय, पाठ आणि ओठांवर अनेक ठिकाणी चटके दिले. त्यानतंर त्याने माझे हातपाय बांधून टाकले. आणि मी बचावासाठी आरडाओरडा केला तेव्हा त्याने तोच चाकू माझ्या तोंडातही खुपसला, असा आरोप तिने केला.
तू मला आवडत नाही, तुला जवळ येऊ नको सांगितलं होत ना, मना केलं होतं ना, मग तू का आलीस ? असं तो सतत म्हणत होता. माझ्या आईवडिलांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न लावले होते. चटके दिल्यानंतर त्याने मला दोरीने बांधून ठेवलं होतं. मी कसंबसं स्वतःला दोरीतून सोडवून घेतलं आणि पहाटे 4:30 च्या सुमारास बाहेर आले. घरात झाडू मारणाऱ्या काकांच्या मोबाईल फोनवरून कुटुंबियांना फोन केला आणि जे घडलं त्याची माहिती दिली, असं पीडीतेने सांगितलं.
खुशबूच्या सांगण्यानुसार, लग्नापासून दिलीपला ती आवडत नव्हती. तो तिला मारहाण करायचा आणि हुंड्याची मागणीही त्याने केली होती. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या भावाने अंजद गाठले आणि आपल्या बहिणीला तिच्या माहेरी अवराक्ष येथे घेऊन आला.मुलीवर अत्याचार पाहून तिच्या कुटुंबीयांनी पीडितेला खरगोणच्या मैनगाव पोलिस ठाण्यात आणले आणि सगळी घटना कथन केली. पोलिसांनी खुशबूला जिल्हा रुग्णालयात दाखल केले जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
COMMENTS