पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. पराभव झाला की विरोधक निव...
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. पराभव झाला की विरोधक निवडणूक आयोगावर खापर फोडतात आणि जिंकले की आयोगाचा उदोउदो करतात, असे ते म्हणाले.
लोकांची कामे केली तर ते तुमच्या पाठीशी उभे राहतात, असा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.
निवडणूक आयोगावर विश्वास ठेवा
नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी विरोधकांना फटकारले. "विरोधकांकडे आता काहीही मुद्दे उरले नाहीत. ईव्हीएमवर आरोपांनंतर आता मतदारयाद्यांचा मुद्दा काढला जात आहे. जेव्हा विरोधक जिंकतात, तेव्हा त्यांना निवडणूक आयोगात काहीही दोष दिसत नाही. मात्र, पराभव झाल्यानंतर तो पचवता येत नसल्याने असे आरोप केले जातात," असे त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS