बीड : पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखामध्ये आपला जीव धोक्यात घालून तीन युवकांचे प्राण वाचवले आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश शिंदे ...
बीड : पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखामध्ये आपला जीव धोक्यात घालून तीन युवकांचे प्राण वाचवले आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
परळी तालुक्यातील कौडगाव हुडा-कासारवाडी रस्त्यावरील नदी प्रवाहात एक कार वाहून गेल्याने चार युवक मध्यरात्री पुरात अडकले होते. याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि शिरसाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांना समजली. घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्वतः आपला जीव धोक्यात घालत पूर्ण प्रवाहामध्ये उडी घेतली आणि तीन युवकांचे प्राण वाचवले आहेत.
पोलिसांनी या घटनेत वाहून गेलेल्या अमर मधुकर पौळ (वय २२, रा. डिग्रस), राहुल संपती पौळ (वय ३२), राहुल सटवाजी नवले (वय २२, रा. फुलारवाडी ता. पाथ्री) या तिघांना सुखरूप बाहेर काढले. परंतु, विशाल बल्लाळ (वय २४, रा. बोरी सावरगाव ता. केज) या युवकाचा मृ्त्यू झाला आहे.
COMMENTS