लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला डोळे बंद करायला लावले आणि 20 वेळा वार केले. या घटनेत पत्नीचा जागी...
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला डोळे बंद करायला लावले आणि 20 वेळा वार केले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
मेरठमधील गंगानगर येथील अमेडा गावात ही घटना घडली आहे. या पतीने आपल्या पत्नीची चाकू आणि ब्लेडने वार करत हत्या केली. पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. आरोपीने स्वतः पोलिसांना आपल्या पत्नीच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि आरोपीला अटक केली.
अमेडा गावातील भवनपूर येथील रहिवासी रविशंकर याने पत्नी सपना (वय 26) हिची चाकूने वार करून आणि ब्लेडने वार करून हत्या केली. आरोपीने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या गळ्यात लॉकेट घालण्याच्या बहाण्याने तिला डोळे बंद करण्यास सांगितले. तिने डोळे बंद करताच त्याने तिचा गळा चिरला, त्यानंतर तिच्यावर 20 वेळा वार केले. या हल्ल्यामुळे सपनाच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. आरोपीने स्वतः फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याची चौकशी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपनाचे लग्न यावर्षी जानेवारीमध्ये झाले होते. सपना तिच्या सासरच्या घरातून पाच दिवसांपूर्वी तिच्या बहिणीच्या घरी आली होती. आरोपीला पत्नीवर संशय होता, त्यावरुन हा गुन्हा घडला आहे. चौकशीदरम्यान रविशंकरने सांगितले की, त्याने सपनाला डोळे बंद करण्यास सांगितले, त्याने तिच्यासाठी एक लॉकेट आणले होते. तो स्वतःच्या हातांनी तिच्या गळ्यात घालणार होता. त्यासाठी त्याने सपनाला डोळे बंद करण्यास सांगितले. आणि त्याने तिचा गळा चिरला. कुटुंबाने त्याच्यावर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप करत आहे.


COMMENTS