नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर मदत मागू...
नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला.
मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे.
अमित यादव अस मृत महिलेचे नाव आहे. अमित यादव असे पतीचे नाव आहे. देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी (ता. १०) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने कट लागल्याने पत्नीपडून ट्रकच्या चाकाखाली आली. यात पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला असताना मदतीसाठी कोणीही वाहन थांबवायाला तयार नव्हते. कुणीही माणुसकी दाखवायला तयार झाले नाही.
हतबल पती अमित यादवने डोळ्यांतून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करत राहिले. परंतु, कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. अखेरचा पर्याय म्हणून पतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्यप्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पती-पत्नी हे माध्यप्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहे. ते मागील 10 वर्षापासून पती अमित भुरा यादव (वय 35) याच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा येथे राहत होते. रक्षाबंधन असल्याने अमित मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होता. प्रवासादरम्यान अपघात झाला.
पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या कारमधील व्यक्तीने हा सगळा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. दिवसाढवळ्या अपघात घडूनही त्यांच्या मदतीसाठी कुणी आलं नाही. सुरुवातीला मदतीची याचना करूनही कोणीही मदत केली नाही. मात्र, मृतदेह दुचाकीवर घेऊन जाताना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र भीतीने तो थांबायला तयार नव्हता. याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी अमितला रोखले आणि ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.


COMMENTS