जालना : एक कार थेट 80 फुट खोल विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राजूर-जाफराबाद मार्गावर गाडेगव्हाण येथे ही घटना घडली आहे. य घटनेने ...
जालना : एक कार थेट 80 फुट खोल विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राजूर-जाफराबाद मार्गावर गाडेगव्हाण येथे ही घटना घडली आहे. य घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पावलेल्या नागरीकांमध्ये दोन महिलांचा व तीन पुरूषांचा समावेश आहे.
1) ज्ञानेश्वर भाऊसाहेब टकले, 2) निर्मलाबाई सोपान डकले, 3) पदमाबई लक्ष्मण भांबीरे, 4) ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबीरे अशी या चार मृतांची नावे आहेत. पाचव्या मृत व्यक्तीचे नाव कळू शकलेले नाही. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सूरू आहे. मृत व्यक्ती ही गेवरी गुंगे आणि कोपरडाके या दोन गावांतील असल्याची माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरहून जाफराबादच्या दिशेने भरधाव कार निघाली होती. यावेळी भरधाव कारने गाडेगव्हाण फाट्यावर पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या अपघातानंतर कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि थेट काही अंतरावर असलेल्या 80 फुट खोल विहिरीत जाऊन कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत पूर्ण गाडी पाण्यात बुडाली होती. त्यामुळे स्थानिकांनी तत्काळ हसनाबाद पोलिसांना टेंभुर्णी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याला सूरूवात केली होती. यावेळी तब्बल सात ते आठ तासानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत.
COMMENTS