बीड: बीड शहराजवळील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार ...
बीड: बीड शहराजवळील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची घटना आज (शनिवार) सकाळी साडेसातच्या सुमारास नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ घडली.
एका कंटेनरने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या सहा लोकांना जोरदार धडक दिली. या धडकेत चौघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे.
अपघातग्रस्त हे पेंडगाव येथे देव दर्शनासाठी जात होते. मात्र वाटेतच त्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिस अपघातग्रस्तांची ओळख पटवत आहेत. या अपघातामुळे सोलापूर धुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
COMMENTS