पुणे: पुणे शहरातील कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता युवतीच्या चेहऱ्यावर कुरिअर बॉयने स्पे मारून अत्याचार केल्याची घटना घडल्यानं...
पुणे: पुणे शहरातील कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता युवतीच्या चेहऱ्यावर कुरिअर बॉयने स्पे मारून अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं शोध घेत होती.
युवतीवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा आणि जुना मित्र असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित युवती घरी एकटी असल्याची संधी साधत कुरिअर देण्याच्या बहाण्याने आरोपीने घरात प्रवेश केला आणि पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 2) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता. पोलिसांची दहा पथकं त्याच्या मागावर होती. अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोंढवा परिसरातील युवतीने (वय २५) कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार 28 ते 30 वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कामाला आहे. ती दोन वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास युवती एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपीने दरवाजा वाजवला. तेव्हा त्याने कुरिअर बॉय असल्याचे सांगितले. पण, युवतीने कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगितले आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. युवतीला बोलण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. यामुळे तिचे डोळे जळजळले अन् आरोपी घरात शिरला. त्याने युवतीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे फोटो काढले. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने म्हटले आहे.
COMMENTS