लातूर: लातूर शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या आहे. प्रियकराने फोन उचलला नाही. यानंतर ...
लातूर: लातूर शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या आहे. प्रियकराने फोन उचलला नाही. यानंतर अस्वस्थ झालेल्या युवतीने स्वत:चं आयुष्य संपवले.
सकाळी प्रेयसीच्या मृत्यूची बातमी समजताच तरुणाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वैष्णवी विनोद लादे (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. तर नरेंद्र रामराव राठोड (वय २५) असे विष घेणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे पीएसआय मनीष आंधळे यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील रहिवासी निवृत्त शिक्षक रामराव राठोड यांचे म्हाडा कॉलनीत घर आहे. त्या घरात त्यांचा मुलगा नरेंद्र शिक्षणासाठी एकटाच राहतो. या घरापासून काही अंतरावर बारावीचे शिक्षण झालेली वैष्णवी लादे राहत होती. दोघे काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. चार दिवसांपूर्वी नरेंद्र हा पुण्याला जॉब करण्यासाठी गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो लातूरला परत आला. त्याने वैष्णवीच्या मॉलमध्ये जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु मॉलमधील युवकांनी नरेंद्रसोबत वाद घालत त्याला मारहाण केली. या घटनेनंतर मध्यरात्री २ वाजता वैष्णवीने नरेंद्रला मेसेज आणि कॉल केले, परंतु नरेंद्रने तो मेसेज सकाळी ६ वाजता पाहिला. यानंतर त्याला थेट वैष्णवीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. नंतर नरेंद्रने उंदीर मारण्याचे औषध घेतले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर आहे.
प्रियकर नरेंद्र राठोडनं सांगितले की, रात्री ११ वाजता जेवण झाले का? असा वैष्णवीचा मेसेज आला. त्यानंतर मी झोपी गेलो. मध्यरात्री २ वाजता तिचे दोन कॉल येऊन गेले. परंतु फोन सायलेंट मोडवर असल्यामुळे मला समजले नाही. ते कॉल मी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पाहिले. नेहमी सकाळी १०.३० नंतर तिचा कॉल यायचा, परंतु मी कॉल केल्यावर माझा नंबर रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेला आढळला. त्यानंतर सकाळी ११ वाजता तिने आत्महत्या केल्याचे माझ्या मित्राकडून समजले. मी औसा रोडवरून विषाची बाटली खरेदी करून विष घेतले. रात्रीच तिचे कॉल मी उचलले असते तर कदाचित ती वाचली असती, असे उपचार घेणाऱ्या नरेंद्र राठोडने सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या पालकांनी अद्याप तक्रार दिलेली नाही, त्यामुळे त्यांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
COMMENTS