इंग्रजी केवळ एक बांध नाही तर पूल आहे. इंग्रजी ही शक्ती आहे. इंग्रजी म्हणजे बेड्या नव्हेत तर बेड्या तोडणारं हत्यार आहे. त्यामुळेच गरिबांच्य...
इंग्रजी केवळ एक बांध नाही तर पूल आहे. इंग्रजी ही शक्ती आहे. इंग्रजी म्हणजे बेड्या नव्हेत तर बेड्या तोडणारं हत्यार आहे. त्यामुळेच गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये यासाठी भाजप आणि आरएसएसचा डाव असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक काळ असा येईल की इंग्रजीची लाज वाटेल असं व्यक्तव्य केलं आहे. त्याला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं.
केंद्र सरकारने भाषात तिसऱ्या भाषेचा पर्याय आणला आहे. हिंदी भाषा सर्व राज्यांमध्ये तिसरी भाषा म्हणून अभ्यासक्रम आणि प्रशासकीय कामकाजात वापरात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दक्षिणेतील राज्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात ५ वीपासून अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, त्यामुळे राजकीय घमासान सुरू आहे.
राहुल गांधींनी नक्की काय म्हटलंय?
राहुल गांधींनी एक्स वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, इंग्रजी फक्त एक बांध नाही तर जगाशी जोडणारा पूल आहे. इंग्रजी ही लाज नाही तर शक्ती आहे. इंग्रजी ही साखळदंड नाही तर साखळदंड तोडण्याचं हत्यार आहे. त्यामुळे भाजप आणि आरएसएसला गरीब मुलांनी इंग्रजी शिकावे असं वाटत नाही. गरिबांच्या मुलांनी शिकून पुढे जावं, समानतेने राहावं असं त्यांनी वाटत नाही. आजच्या काळात, इंग्रजी तुमच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. कारण इंग्रजी भाषा रोजगार देईल आणि आत्मविश्वास वाढवेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
भारतातील प्रत्येक भाषेत एक आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांची कदर केली पाहिजे. पण इंग्रजीही तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे ती शिकली पाहिजे. जगाशी स्पर्धा करणाऱ्या भारताकडे हाच मार्ग आहे, जो प्रत्येक मुलाला समानतेची संधी देतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राहुल यांनी पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. इंग्रजी हे एक शस्त्र आहे. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही जगात कुठेही प्रवास करू शकता. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही अमेरिका, जपान आणि इतर कुठेही जाऊ शकता. तुम्ही कुठेही काम करू शकता. जे इंग्रजीच्या विरोधात आहेत त्यांना तुम्हाला कोट्यवधी रुपयांची नोकरी मिळावी असं वाटत नाही. विदेशातील दारं तुमच्यासाठी बंद ठेवण्याचा हा डाव असल्याची टीका राहुल गांधी यांनी केला आहे.
COMMENTS