सातारा जिल्ह्यातील संविधान प्रसार आणि प्रचाराच्या उद्देशाने अहोरात्र काम करणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्क...
सातारा जिल्ह्यातील संविधान प्रसार आणि प्रचाराच्या उद्देशाने अहोरात्र काम करणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार पाडळी( केसे) तालुका कराड येथील रहिवाशी तिरंगा रक्षक, आणि दैनिक क्रांतिकारी जयभीम चे संपादक पत्रकार विश्वास मोहिते यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
विश्वास मोहिते यांनी यांनी वाढदिवसादिनी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाढदिवसाच्या नियोजित कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे, कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा ), स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दादासाहेब उंडाळकर, स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुतळ्यासह कराड आणि साताऱ्यामध्ये असणाऱ्या इतर थोर महापुरुषांच्या, थोर विचारवंतांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. विश्वास मोहिते यांच्या मित्र मंडळाच्या वतीने विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट,गोरगरिबांना कुटुंबात लागणाऱ्या साहित्यांची सहकार्य म्हणून मदत, काही ठिकाणी वृद्धाश्रमात विविध साहित्याची मदत करणे अशा कार्यक्रमाचा समावेश होता यामध्ये विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील दीपक मोहिते, सांगली जिल्ह्यातील बाबासाहेब कांबळे, रत्नागिरी जिल्ह्यातील असलम शेख, सातारा जिल्ह्यातील सागर जाधव, या मित्र मंडळींनी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
विश्वास मोहिते यांना वाढदिवसाच्या निमित्ताने झाल्याबद्दल दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे, रेठरे बुद्रुक गावचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते (दादा), काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कराड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे,आर.पी.आयचे सातारा जिल्हा सरचिटणीस समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड,राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय तडाके, दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवडी, कराड येथील पत्रकार हैबत आडके, माय मराठी न्यूज चैनल च्या संपादिका मुस्कान तांबोळी, कराड दक्षिण शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण, एडवोकेट हरीश काळे, बहुजन समता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कोतवाल संघटनेचे पदाधिकारी निवास सुतार, पाडळी केसे चे माजी सरपंच मोहम्मदअली शेख,पाडळी केसे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदराव बडेकर, भीम आर्मीचे पदाधिकारी प्रवीण सावंत,राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे पाटण तालुका अध्यक्ष सागर जाधव, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार आणि स्वयंरोजगार संघटनेचे राज्य अध्यक्ष महारुद्र तिकुंडे,माय मराठी टीव्ही चॅनल च्या संपादिका मुस्कान तांबोळी, मालदन च्या प्रथम नागरिक सरपंच सौ.गीतांजली काळे, माजी उपसरपंच संदीप काळे, मालदन चे युवा नेते संजय चव्हाण सह विविध मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
COMMENTS