सोलापूर : मोहोळ तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्काद...
सोलापूर : मोहोळ तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य केंद्रात गेलेल्या महिलेसोबतच या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. एका महिलेला वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट हवे असल्याने ती संबंधित आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेली होती. तपासणी करत असताना आरोग्य केंद्रातील डॉक्टर अमित गायकवाड याने तपासणीच्या नावाखाली महिलेस अश्लीलरीत्या स्पर्श केला. यानंतर महिनेले धाडस दाखवत थेट पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दिली.
महिलेच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिसांनी डॉक्टर अमित गायकवाड याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS