पुणेः पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणारा संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल ...
पुणेः पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणारा संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता मुलानं स्वत: व्हॉट्सअॅपवर ऑडिओ क्लिप पाठवून आपण विष प्यायल्याची माहिती दिली आणि लोकेशनही सांगितले.
संजयच्या आत्महत्येचं कारणंही आता समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक ऑडियो रेकॉर्ड केला होता. यात त्याने म्हटले आहे, "मम्मी, मी माझा मोबाइल तोडणार आहे. कोणताही पुरावा राहणार नाही. मी मरू इच्छितो. मी विष प्राशन केले आहे. मी लोकेशन पाठवलं आहे. माझा मृतदेह घेऊन जा. जसे सगळे मरतात, तसा मीही मरतोय. मला कुणाला काही म्हणायचं नाहीये. आई-वडिलांना एवढं म्हणणे की, माझ्या बहिणींना काही त्रास होऊ देऊ नका. मला फक्त माझ्या बहिणींची चिंता आहे. बाकी मला कुणाची चिंता नाही,' या मेसेजच्या आधारे पोलिसांनी घोरडेश्वर डोंगराच्या पायथ्याला जाऊन तपास केला असता, संजयचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार, संजयने डिप्रेशनच्या कारणातून आयुष्याचा शेवट केल्याचे समोर आले आहे.
देहूरोड पोलिस ठाण्यात संजय बेपत्ता असल्याची तक्रार 17 जून रोजी नोंदवण्यात आली होती. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटलीही सापडली. पोलिस तपासात संजयने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही याची पुष्टी केली आहे.
संजय हा पिंपरी-चिंचवड परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणींचा समावेश आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये त्याने आपल्या बहिणींच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि आई-वडिलांना त्यांना उच्च शिक्षण देण्याची विनंती केली. एका व्हिडिओतही संजय डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने ऑनलाइन विषारी औषध मागवले होते आणि त्याच औषधाचं सेवन करून त्याने आत्महत्या केली. सध्या देहूरोड पोलिस आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओची सखोल तपासणी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS