सांगली: माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून लाकडी खुंट्याने बेदम मारहाण ...
सांगली: माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे. साधना धोंडीराम भोसले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी धोंडीराम भोसले या बापास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले? असे विचारात माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यपक असलेल्या बापाने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सांगली जिल्ह्यात घडली. नेलकरंजी येथे साधना भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती. नेलकरंजी गावातच खाजगी शिक्षण संस्थेत वडील धोंडीराम भोसले हा मुख्यध्यापक आहे. बारावीच्या चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाल्याचे समजल्यानंतर धोंडीराम भोसले प्रचंड संतापला होता. रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीत साधना हे गंभीर जखमी झाली होती. शुक्रवारी रात्री 9.30च्या सुमारास मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला बापाने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाले होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्या दिवशी सकाळी योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेला होता. घरी आल्यानंतर साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु, केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक बापाने केलेल्या मारहाणीत तिचा बळी गेला आहे. याप्रकरणी धोंडीराम भोसले याला आटपाडी पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS