पुणे: पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन चुलत भावांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे. ...
पुणे: पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन चुलत भावांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी युवकाचे थेट हात पाय तोडले असून, ते धडावेगळे केले आहेत.
या घटनेमुले दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील बिरोबावाडी परिसरात ही घटना घडली. शेतीच्या बांधावरील वादातून चुलत भावांनीच आपल्या भावाचे निर्घृणपणे हात पाय तोडून शरीरापासून वेगळे केले आहेत. कैलास हगारे असे गंभीर जखमी झालेल्या शेतकरी युवकाचे नाव आहे. हल्ल्याची ही घटना समोर येताच त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले आहे.
जखमी कैलास यांचे मागील काही दिवसांपासून चुलत भावांसोबत शेतातील बांधावरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी कैलासवर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी फावडे आणि खोऱ्याच्या सहाह्याने कैलासवर हल्ला केला. आरोपींनी हात आणि पाय दोन्ही शरीरापासून वेगळे केले. यानंतर आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या युवकाला शेतातच टाकून पळ काढला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच यवत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे, गणेश हगारे आणि इतर तीन जणांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. चुलत भावांनीच अशाप्रकारे युवकावर हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS