पुणे : पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरात विवाहित महिलेने सहा वर्षीय चिमुकल्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्का...
पुणे : पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरात विवाहित महिलेने सहा वर्षीय चिमुकल्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंबेगाव बुद्रुकमधील कल्पक सोसायटीत घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.
मयुरी देशमुख (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
मयुरी देखमुखने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये नणंदेच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. मयुरी देशमुख हिने स्वतःच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याला घेऊन पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनांही रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडी शिक्षिका होत्या. त्यांचे पती शशिकांत हे एका बँकेत नोकरी करतात. देशमुख कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. विष्णू त्यांचा एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने पाचव्या मजल्यावरुन सहा वर्षांचा मुलगा विष्णू याच्यासह उडी मारली. त्या वेळी मयुरीचे पती घरात नव्हते. आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णू हे सोसायटीतील आवाारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोालीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने घटनास्थळी आले. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मयुरीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. नणंदेच्या त्रासामुळे आत्महत्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS