मुंबई: मुंबईत एका धावत्या कारमध्ये महिला पायलटचा लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा...
मुंबई: मुंबईत एका धावत्या कारमध्ये महिला पायलटचा लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे.
इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. महिला पायलटवर धावत्या कारमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिला पायलटने (वय २८) पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी संध्याकाळी उशिरा ती आपल्या पतीला भेटण्यासाठी सीएसएमटी स्टेशनवर आली होती. तिच्या पतीने फोर्ट परिसरातून तिच्यासाठी रात्री १०.४५ वाजता कॅब बूक केली. काही वेळाने, ती कारमध्ये बसली आणि तिच्या घराच्या दिशेने निघाली. जवळपास २५ मिनिटं प्रवास केल्यानंतर, ड्रायव्हरने अचानक मार्ग बदलला. एकेठिकाणी कार थांबवली आणि दोन अनोळखींना कारमध्ये बसवले. दोघांपैकी एकजण पुढच्या सीटवर बसला आणि दुसरा व्यक्ती माझ्याशेजारी मागच्या सीटवर बसला. दोन्ही आरोपी २५ ते ३० वयोगटातील होते.’
पीडित महिला पायलटने पुढे सांगितले की, ‘कॅबमध्ये तिच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने तिचा उजवा हात धरला आणि तो पिरगळला. ती घाबरून ओरडू लागली. तेव्हा तिच्या समोर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने तिला गप्प बसण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या माणसाने तिच्या मांडीवर हात फिरवला. त्यावेळी ड्रायव्हर कार चालवत होता. त्याने यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी पाहून ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी दोन्ही पुरुष गाडीतून उतरले आणि पळून गेले. या सगळ्या प्रकारानंतर कॅब ड्रायव्हर पीडितेला घेऊन तिच्या पत्त्यावर गेला. घरी पोहोचल्यावर पीडितेनं याबाबत ड्रायव्हरला जाब विचारला. कारमध्ये शिरलेले दोन व्यक्ती कोण होते, हे विचारलं. मात्र चालकानं काहीच सांगितलं नाही. घाबरलेल्या अवस्थेत महिलेने चालकाला ५३० रुपये भाडं दिले आणि ती निघून गेली.’ दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS