रायगड: रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील काकर तळे गावात एका युवतीचा टेरेसवरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे....
रायगड: रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील काकर तळे गावात एका युवतीचा टेरेसवरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रिया किशोर चौधरी (वय २०) असे मृत युवतीचे नाव आहे.
ती महाड शहरातील काकर तळे परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. ती ज्या इमारतीत राहते, ती समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटी चार मजली आहे.ती काही कामानिमित्त टेरेसवर गेली होती. यावेळी ती अचानक टेरेसवरून खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली. अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. ही घटना घडताच कुटुंबीयांसह शेजारील लोकांनी तिला तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इमारतीवरून पडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने युवतीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप शवविच्छेदन अहवाल समोर आला नाही.
दरम्यान, युवती टेरेसवर नेमकी कशासाठी गेली होती. टेरेसवर तिच्यासोबत काय घडलं? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. ती टेरेसच्या काठावर बसली असावी आणि अचानक तिचा तोल गेला असावा, यातूनच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS