लखनौ (उत्तर प्रदेश): लग्नाला जाणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाने बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढले आणि शरीरापासून वेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना ...
लखनौ (उत्तर प्रदेश): लग्नाला जाणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाने बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढले आणि शरीरापासून वेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना हाथरस येथे घडली आहे. मुलगा बसमध्ये बसून लग्न समारंभात सहभागी होणार होता.
ठाणा हाथरस जंक्शन परिसरातील कैलोरा चौकात ही घटना घडली. बसच्या खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी मुलाने त्याचे डोके बाहेर काढले होते, यावेळी त्याचे डोके टाटा मॅजिकच्या तावडीत आले आणि ते पूर्णपणे कापले गेले. मृत मुलगा त्याच्या २ चुलत भावांच्या लग्नाला निघाला होता. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला.
अलीगडच्या मखदूमनगरहून हाथरसच्या मोहरी गावात त्याच्या दोन चुलत भावांच्या लग्नाला उपस्थित निघालेल्या अली याच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS