अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, अजूनही घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. जळालेले मृतदेह शोधण्याचं क...
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, अजूनही घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. जळालेले मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. एका ढिगाराखाली विमानाच्या शेपटीमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह आढळला असून, तो पाहिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताच्या ढिगाऱ्यातून तिसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमकडून शोधकार्य सुरू आहे. विमानाच्या शेपटीमध्ये फ्लाईट अटेंडंटचा मृतदेह अडकल्याचे आढळून आले आहे. एनडीआरएफची टीम लगेच तिथे पोहोचली आणि मृतदेह बाहेर काढला. तिसऱ्या दिवशी मृतदेहाची अवस्था न बघण्यासारखी होती. जीव वाचवण्यासाठी या महिला क्रू मेंबरने विमानाच्या मागील भागाकडे धाव घेतली होती, पण तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला. या महिलेचा मृतदेह अक्षरश: छिन्नविछिन्न झाला होता. चेहरा आणि शरिराचा इतर भाग जळाले होते.
जवानांनी कटरच्या मदतीने विमानाच्या शेपटीचा भाग कापला आणि मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आले. या महिला कर्मचाऱ्याने जीव वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले असतील ते यावरून दिसून आले. या महिला कर्मचाऱ्याचा मृतदेह एका ब्लॅकेटमध्ये गोळा करून खाली आणण्यात आला.
बीजे मेडिकल कॉलेजच्या छतावर विमानाचा शेवटाचा भाग अडकून पडलेला होता. आज तो हटवण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आता २७९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये प्रवासी आणि मेडिकल कॉलेजच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
COMMENTS