प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे रयत शिक्षण संस्थेच्या भिमाशंकर विद्यामंदिर व श्री.टी. एस.बोराडे (कला व विज्ञान) कनिष्ठ महाविद्यालय शिनोली वि...
प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
रयत शिक्षण संस्थेच्या भिमाशंकर विद्यामंदिर व श्री.टी. एस.बोराडे (कला व विज्ञान) कनिष्ठ महाविद्यालय शिनोली विद्यालयातील होतकरू,गरीब व हुशार विद्यार्थ्यांना भगवानशेठ बोऱ्हाडे (चेअरमन,टी. एस.ग्रा.पतसंस्था )आणि कुटुंबियांकडून मातोश्री कै.सौ. विमल भगवान बोऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शिनोली गावचे बहुसंख्य ग्रामस्थ पालक आणि विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थापक डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविध्य पत्नी लक्ष्मीबाई पाटील वहिनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मधुकर (आप्पा) बोऱ्हाडे (संचालक,ख.वि.संघ आंबेगाव)यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सोमवंशी(सचिव टी.एस.ग्रा.पतसंस्था) यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अभंग ए.डी.,देविदास बोऱ्हाडे (रेडिओस्टार),पुरुषोत्तम फदाले(व्हा. चेअरमन टी.एस.ग्रा. पतसंस्था)आदि मान्यवरांनी कै.विमलबाई बोऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ वह्या देऊन मातृऋण व्यक्त करणाऱ्या कुटुंबीयांचे कौतुक करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.विद्यालयाचे प्राचार्य अभंग ए.डी. यांनी आपल्या मनोगतातून बोऱ्हाडे कुटुंबीयांचे ऋण व्यक्त करून विद्यार्थ्यांना या कार्याचा आदर्श घ्यावा आणि चांगला अभ्यास करून गुणवत्ता प्राप्त करावी असा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर (आप्पा)बोऱ्हाडे यांनी कै. विमलबाईंनीआपल्या कुटुंबात चांगले संस्कार दिले.नेहमीच दातृत्वाची शिकवण आपल्या मुलांना दिली.त्यामुळे आज त्यांच्या माध्यमातून हे कुटुंब सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात असे योगदान नेहमीच देत आहेत.विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा करून घ्यावा असा संदेश दिला.याप्रसंगी भगवानशेठ बोऱ्हाडे, संतोष बोऱ्हाडे,राजेश बोऱ्हाडे, नथूशेठ ढेरंगे,शफीशेठ मोमीन,गणेशशेठ बोऱ्हाडे (उपसरपंच)भरतशेठ फदाले,महेश शेजवळ,प्रकाश बोऱ्हाडे,जिजाराम येवले,शंकरशेठ शहा, सौ.वाळुंज ए.के.(पर्यवेक्षिका) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी. गवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ठुबे ए.व्ही.यांनी केले.
COMMENTS