ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्...
ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज्येष्ठ चित्रकार आणि कवी) यांच्या उपस्थितीत हा स्मृती जीवनगौरव पुरस्कार २०२५ नीलपुष्प साहित्य मंडळातील मा. नरेश पाटील, मा. प्रा.मीना कुलकर्णी, सौ. शैला गिरनारकर, मास्टर राजरत्न राजगुरू, शाहीर किरण सोनवणे, आणि मा. विश्वास पटवर्धन या सहा ज्येष्ठ साहित्यिकांना मान्यवर पाहुण्याच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या शुभहस्ते गणेश पूजन आणि सरस्वती पूजन झाल्यावर स्व. डॉ नारायण तांबे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. त्यानंतर कवयित्री सौ. शशिकला कुंभार यांनी गणेश स्तवन सादर केले. सौ सृष्टी गुजराती आणि त्यांच्या सहकलाकारांनी बासरीवर सुंदर असे महाराष्ट्र गीत सादर केले आणि सौ प्रियांका चिटणीस यांनी जयोस्तुते हे देशभक्तीवरील सुंदर गीत सादर केले या सुंदर वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. या नंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय देत असताना संस्थेचे अध्यक्ष राजेश साबळे ओतूरकर यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवर पाहुण्याच्या शाल, स्मृतीचिन्ह पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश साबळे ओतूरकर यांनी केले.. यामध्ये व्यासपीठावरील उपस्थित आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व रसिक वाचक, साहित्यिक लेखक, गायक, तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचे स्वागत करून ...नीलपुष्प साहित्य मंडळाची वाटचाल त्यासोबत साहित्य समूहातील सदस्यांनी साहित्य मंडळासाठी दिलेले मौलिक योगदान याबद्दल माहिती देताना आजचा दिवस स्मृती जीवनगौरव पुरस्कारासाठी का निवडला याबद्दल सविस्तर माहिती दिली. सदरचा जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले.
त्यानंतर मान्यवर पाहुण्याच्या शुभहस्ते नीलपुष्पाच्या सहा ज्येष्ठ साहित्यिकांचा शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी पुरस्कारार्थीच्या सन्मानपत्राचे अभिवाचन सौ सावित्री ताई झांबरे यांनी वाचन केले.
या सोबतच नीलपुष्प साहित्य मंडळाचे सचिव आणि कवी ज्येष्ठ चित्रकार प्रा. सुरेश गे. डुंबरे लिखित 'मन पाखरू' या काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन झाले. सदर काव्यसंग्रह राजसा प्रकाशन उल्हासनगर ठाणे या संस्थेने प्रकाशित केला असून या काव्यसंग्रहाची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतूरकर यांनी लिहिली आहे.
सदर प्रसंगी कवी प्रा सुरेश डुंबरे यांनी त्यांच्या काव्य संग्रहाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर व्यासपीठावरून आपले मनोगत व्यक्त करताना सर्व पाहुणे मंडळींनी नीलपुष्प साहित्य मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. आणि मन पाखरू काव्य संग्रहास मनापासून शुभेच्छा दिल्या.
याच कार्यक्रमात ज्या ज्या साहित्यिकांचा जन्म दिवस आहे त्या सर्वांसाठी केक कापून सर्वांचे अभिष्टचिंतन केले.
याप्रसंगी 'बार बार दिन ये आये बार बार दिन ये गाये तुम जियो हजारो साल' या सुंदर हिंदी गाण्याची धून वाजविण्यात आली.
कार्यक्रमात सौ सावित्री ताई झांबरे, सौ शशिकला ताई कुंभार, श्रीम. सुनीता भालेराव, सौ शैला गिरणारकर श्रीम. मोहसीना ताई पठाण श्री. तानाजीराव झांबरे श्री आनंद रांजणे यांनी सक्रीय सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रा. नागेश हुलवळे प्रा सुरेश डुंबरे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कवी रविंद्र कारेकर, आनंद रांजणे आणि तानाजीराव झांबरे यांनी कार्यक्रमानंतर कार्यक्रमात वापरलेले साहित्य आहे त्या ठिकाणी व्यवस्थित लावले म्हणून सदर कार्यक्रमाची उंची वाढली. यासाठी या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद
नीलपुष्प मंडळातील सर्व उपस्थित सदस्यांना मनापासून धन्यवाद!! आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमातून आजचा स्मृती जीवनगौरव पुरस्कार आणि 'मन पाखरू' पुस्तक प्रकाशन सोहळा खुप सुंदर साजरा झाला. ही सुंदर आठवण कायम मनात राहील.
या सुंदर कार्यकमाचे सूत्र संचालन प्रा नागेश हुलवळे यांनी केले.
याप्रसंगी नीलपुष्प काव्यसंध्या घेण्यात आली. त्यात... प्रा. मीनाताई कुलकर्णी, प्रा.जया राव, सौ सुचित्रा बागडे खाडे, अनिल सोनवणे, कवी परशुराम नेहे, अनिल पागनीस, सुनीता ताई भालेराव, सावित्रीताई झांबरे, अभिमन्यू शिरसाट, रविंद्र कारेकर, कमल अस्वले किरण सोनवणे, मास्टर राजरत्न राजगुरू, विश्वास पटवर्धन सौ. शशिकला कुंभार, सौ. शामला ताई वाईकर आनंद रांजणे, सौ अनुराधा पाटील यांच्या कविता सादर झाल्या.. अतिशय सुंदर आणि नयनरम्य सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे संपन्न झाला याचा खुप मनापासून आनंद झाला. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृती अभिवान करून माझ्या लेखणीला पूर्ण विराम देत आहे.
.....................................
राजेश साबळे ओतूरकर
नीलपुष्प (ठाणे)
COMMENTS