अकोला : एका युवतीला भर रस्त्यात काठीने मारहाण करतानाचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेचा व्हिडिओ सध्य...
अकोला : एका युवतीला भर रस्त्यात काठीने मारहाण करतानाचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणारा मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत. ‘तू इतर मुलाशी का बोलते? या कारणावरून भर रस्त्यात एका मुलीला हातातील काठीने जबर मारहाण केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. मारहाण करत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाव व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसत असून, तू इतर मुलांची का बोलते? या कारणावरून त्यानेही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. मारहाण करत असताना कोणीही या मुलाला रोखले नाही.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्यांची भेट घेतल्यानंतर अखेर मुलीचे आईने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
COMMENTS