प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे या पदवी महाविद्यालयामध्य...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे या पदवी महाविद्यालयामध्ये बी.एस्सी.(सायबर सेक्युरिटी)-प्रवेश क्षमता ८० आणि एम.एस्सी.कॉम्प्युटर सायन्स (डेटा सायन्स)-प्रवेश क्षमता २४ हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यास शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्र शासनाने परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
डेटा सायन्स हे क्षेत्र भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे.अलिकडच्या काळात,उपलब्ध डेटाच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि व्यवसायामध्ये डेटाचा अधिक्तम वापर करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.परिणामी,डेटा वैज्ञानिकांना जास्त मागणी आहे.डेटा सायन्स हे तुलनेने नवीन क्षेत्र आहे,ज्यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून स्टॅटिस्टिक्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगपर्यंत विविध विषयांचा समावेश आहे.लिंकडीन,मायक्रोसॉफ्ट,फ्लिपकार्ट,ऍमेझॉन,ओला,एरटेल आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांसारख्या कंपन्या आपापल्या उद्योगातील स्पर्धात्मक यश मिळविण्यासाठी डेटा सायन्सचा वापर करतात.
त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा तज्ञ सर्वात नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक कंपन्यांमध्ये तसेच सल्लागार,वित्त आणि विमा,आयटी,अवकाश आणि संरक्षण,संप्रेषण,सार्वजनिक क्षेत्र इ.अनेकविध क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या अमाप संधी उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोबोटिक सायंटिस्ट,ए-आय इंजिनियर,बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर,रिसर्च सायंटिस्ट,बिग डेटा इंजिनियर,ए-आय डेटा अनालिस्ट अशा विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध आहे.
ई-कॉमर्स,आरोग्य,शिक्षण,सहकार व तंत्रज्ञान,ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ती कमतरता भरून काढण्यासाठी डेटा सायन्स व सायबर सेक्युरिटी हे अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहेत.उत्तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक वर्गाच्या मागणीनुसार बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने हे दोन्ही नवीन अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
सदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉ.उत्तम शेलार-९८८१४१८६७६ व डॉ.लक्ष्मण घोलप-८७८८५०१९०९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS