प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आय टी आय,बेल्हे येथे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत डाय...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आय टी आय,बेल्हे येथे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत डायनामिक इंडस्ट्रीज प्रा.लिमिटेड,पुणे यांच्या वतीने प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आयटीआयच्या ८ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती समर्थ आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी दिली.
या कॅम्पस ड्राइव्हमध्ये १५ विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
समर्थ संकुलातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
फिटर:-
रोहित कवडे,सुधीर नवले,समीर घोटेकर
इलेक्ट्रिशियन:-
ऋषिकेश शिंदे,शुभम खोसे,सचिन आवारी
आयटीआय इलेक्ट्रिशियन:-
कृष्णा कारंडे,यश घोलप
सदर निवड प्रक्रिया डायनामिक इंडस्ट्रीज प्रा.लिमिटेड पुणे चे टेक्निकल डायरेक्टर रोहित गटकळ व एच आर एक्झिक्यूटिव्ह सोनम बांगर यांनी पूर्ण केली.
मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची निवड करताना संभाषण कौशल्य,तांत्रिक ज्ञान,सादरीकरण,सॉफ्ट स्किल,सामान्य ज्ञान या बाबींचा विचार करण्यात आल्याची माहिती डायनामिक इंडस्ट्रीज प्रा लिमिटेड पुणे चे टेक्निकल डायरेक्टर रोहित गटकळ यांनी दिली.
सदर प्लेसमेंट साठी आयटीआयचे उपप्राचार्य विष्णू मापारी तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी विलास सोनवणे,विकास कणसे,महेंद्र न्हावी आदींनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
COMMENTS