प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे सर कौशल्य रोजगार व उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील शा...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे सर
कौशल्य रोजगार व उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.निश्चित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी केले.पांडुरंग हाडवळे म्हणाले की,समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारचे दहा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.सुसज्ज यंत्र सामग्री व कार्यशाळा उपलब्ध आहे.अत्याधुनिक प्रयोगशाळेतील साहित्य विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी तयार केलेले आहे.जुन्नर तालुक्यातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरती निसर्गमय परिसरामध्ये समर्थ शैक्षणिक संकुलात ही संस्था कार्यरत आहे.या प्रशिक्षण संस्थेमध्ये ड्राफ्ट्समन मेकॅनिकल,इलेक्ट्रिशियन,फिटर,मेकॅनिक मोटार व्हेईकल,मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एसी,मेकॅनिक डिझेल,मेकॅनिक ट्रॅक्टर,वेल्डर (गॅस व वीज),कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट इत्यादी अभ्यासक्रम कार्यरत आहेत. त्याचबरोबर टोयोटा या जगप्रसिद्ध कंपनीच्या सहकार्याने ऑटोमोटिव्ह बॉडी रिपेअर व ऑटोमोटिव्ह पेंट रिपेअर या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी २० जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतो.यासाठी ऑनलाईन प्रक्रिया नसून ऑफलाइन डेटअप प्रवेश दिले जाणार आहे.तसेच समर्थ व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून तीस जागा उपलब्ध आहेत यालाही ऑफलाईन अर्ज करून ताबडतोब प्रवेश निश्चिती करून घ्यावी,असे आवाहन विष्णू मापारी यांनी केले. समर्थ शैक्षणिक संकुलात आय.टी.आय.करणाऱ्या मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.यावर्षी जवळपास १००% विद्यार्थ्यांना नोकरी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच प्राप्त झालेली आहे.बजाज ऑटो,हुंडाई,डायनॅमिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा,टाटा मोटर्स,एल अँड टी यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट द्वारे नोकरीच्या संधी संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
शासनाच्या नियमानुसार आय.टी.आय.ची प्रवेश प्रक्रिया पार पडली जाणार असून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरती अर्ज भरता येणार आहे.अधिक माहितीसाठी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क करावा,असे आवाहन प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी केले आहे.
COMMENTS