पुणे: सिंहगडावर आलेल्या एका परदेशी युवकाला महाराष्ट्रातल्या युवकांच्या टोळक्याने अश्लिल शिवी शिकवली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्ह...
पुणे: सिंहगडावर आलेल्या एका परदेशी युवकाला महाराष्ट्रातल्या युवकांच्या टोळक्याने अश्लिल शिवी शिकवली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
आपल्या देशाचा सौंदर्य किंबहुना महाराष्ट्राच्या शौर्याचा ठेवा अभिमानानं सांगायचा की पर्यटकाला शिव्या शिकवायच्या? असा संताप या व्हिडिओवर व्यक्त केला जात आहे.
न्यूझीलंड देशातून पुण्यातील सिंहगड किल्ला सर करण्यासाठी आलेल्या पर्यटकाला महाराष्ट्रातील काही युवक भेटले. अर्थात परदेशी तरुणाला मराठी किंवा भारतीय भाषा येत नसल्यामुळे त्याची गंमत करण्याच्या हेतूने युवकांनी परेदेशी पर्यटकाला अश्लील शिव्या शिकवल्या. समोर जो कोणी दिसेल त्याला हे जाऊन म्हणा असे सांगितले. युवकांनी सांगितल्याप्रमाणे तोही समोर दिसलेल्या युवकाला शिकवलेल्या शिव्या म्हणाला. त्यावर समोरच्या युवकांनी आणखी शिव्या शिकवत मागील टोळक्याला द्यायला सांगितल्या. हे युवक काहीतरी चुकीचं म्हणायला सांगत असल्याचे लक्षात आल्यावर पर्यटक युवक पुढे निघून गेला.
संबंधित व्हिडिओवर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला शिव्या शिकवल्याने आपल्या संस्कृतीला डाग लागल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. हे तरुण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. आपल्या देशात, महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकाला शिवीगाळ शिकवणाऱ्या टोळक्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही होत आहे.
COMMENTS